Ad will apear here
Next
‘खरीप हंगामासाठी योग्य नियोजन करावे’
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकरांच्या सूचना

पुणे : खरीप हंगामासाठी योग्य नियोजन करून शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या आहेत.

खरीप हंगाम, पीक कर्ज व पीक कर्जांचे पुनर्गठन याबाबत पुणे विभागाची आढावा बैठक डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महसूल विभागाचे उपायुक्त प्रताप जाधव, रोजगार हमी योजना विभागाचे उपायुक्त अजित पवार, विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, जिल्हा अग्रणी बँकेचे आनंद बेडेकर आदी उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘मान्सून लांबणीच्या अनुषंगाने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे. पीक कर्ज वाटपाबाबत विशेष लक्ष द्यावे. कर्ज पुनर्गठनात लक्ष देऊन पीक कर्ज वेळेत उपलब्ध करून द्यावे. पीक विम्याबाबत शेतकऱ्यांना अडचण भासू देऊ नये. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी गुणवत्ता नियंत्रणाअंतर्गत बियाण्यांची तपासणी करावी.’

शेती पंपांना वीज पुरवठा, टंचाई नियोजन, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे व अन्य कृषीविषयक योजनांचा आढावा डॉ. म्हैसेकर यांनी बैठकीत घेतला; तसेच शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. 

सध्या बियाणे तसेच खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून पिकांवरील अळीच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना सुरू असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

या बैठकीत विभागातील सर्व जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. या वेळी महसूल, कृषी, सहकार विभागासह जिल्हा अग्रणी बँक व अन्य बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZNGCA
Similar Posts
‘कमी पाऊस होऊनही शेतीतील गुंतवणुकीमुळे उत्पादकता वाढली’ मुंबई : राज्यात गेल्या वर्षी पाऊस कमी होऊनही उत्पादकता ११५ लाख मेट्रिक टन झाली. शेतीतील गेल्या साडेचार वर्षांतील गुंतवणूक आणि जलसंधारणाच्या कामांचे हे यश आहे. या वर्षीच्या खरीप हंगामासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक बि-बियाणे आणि खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसा पीक कर्ज पुरवठा करण्याच्या सूचना बँकांना केल्या आहेत
‘मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करून मतदान प्रक्रिया पार पाडा’ पुणे : ‘भारत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करून निवडणूक प्रक्रिया पार पाडावी,’ अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्‍या.
‘निवडणूक कालावधीत बँकांनी आयोगाच्या सूचनांचे पालन करावे’ पुणे : ‘पुणे विभागातील सर्व बँकांनी निवडणूक कालावधीतील बँकिंग व्यवहार व उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण व देखरेख ठेवण्याच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी,’ अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.
‘निवडणुकीचे काम करताना गोंधळून जाऊ नका’ पुणे : ‘निवडणुकीचे काम करताना गोंधळून जाऊ नका, तुमच्‍या कार्यक्षमतेवर आमचा विश्‍वास आहे, पण तुमचा स्‍वत:वर विश्‍वास असला पाहिजे,’ अशा शब्‍दांत विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा उत्‍साह वाढवला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language